रमजान महिन्यानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या देशवासियांना शुभेच्छा

मुस्लिमांचा पवित्र महिना रमजानला आजपासून प्रारंभ झाला असून, त्यानिमित्त प्रार्थना प्रवचन अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. रमजान महिन्यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

रमजानचा पवित्र महिना श्रद्धा आणि भक्तीचं प्रतिक असून देशवासीयांना करुणा, दया आणि सेवा या मूल्यांची आठवण करून देतो, असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. रमजानचा महिना समाजात शांती आणि सद्भावनेचा प्रसार करेल अशी कामना त्यांनी केली आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.