December 24, 2024 3:11 PM | PM Narendra Modi

printer

प्रधानमंत्र्यांची नवी दिल्ली इथं आर्थिक क्षेत्रातल्या तज्ञांशी चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं आर्थिक क्षेत्रातल्या तज्ञांशी चर्चा केली. केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीची तयारी म्हणून ही बैठक झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुभ्रमण्यम आणि इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.