प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना आणि डाळींमध्ये आत्मनिर्भरता मोहीम देशातील लाखो शेतकऱ्यांचं भविष्य बदलतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला. पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेसह ४२ हजार कोटी रुपये खर्चाच्या कृषी योजनांचा प्रारंभ काल पंतप्रधानांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. देशात विविध ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमांत शेतकरी दूरस्थ पद्धतीनंसहभागी झाले होते. या योजना आत्मनिर्भरता, ग्रामविकास आणि कृषी नवोपक्रमाच्या नवीन युगाची सुरुवात आहेत; असं पंतप्रधान म्हणाले. देशातल्या ३५ लाख हेक्टर क्षेत्रावर डाळीचं उत्पादन करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे. यात तूर, उडीद, मसुर डाळीचं उत्पादन वाढवलं जाईल, याचाफायदा दोन कोटी डाळ उत्पादकांना होईल, असं त्यांनी सांगितलं. धनधान्य योजनेत पशुधनावरही लक्ष केंद्रित केल्यांचं पंतप्रधान म्हणाले.
Site Admin | October 12, 2025 9:26 AM | PM | PM Dhandhanya Krishi Yojana and Pulse Production
पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
