राज्यात पुणे इथं आयोजित कार्यक्रमात आज धनधान्य कृषी योजनेचा प्रारंभ कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झाला. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं जाईल, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. कडधान्य हे आपल्या आहारातील प्रथिनाचं मुख्य साधन असून आपल्या देशात अजूनही कडधान्याची कमतरता आहे. त्यामुळे हरभरा, मूग, तूर, उडीद, मसूर या डाळींचं उत्पादन वाढवण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं आहे, असं कृषीमंत्री म्हणाले. शेतीसाठी सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करा, सेंद्रीय खताचा वापर करा, शासनाच्या योजनांचा लाभ घ्या, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा, असं आवाहन भरणे यांनी केलं. शेतीसाठी सर्वांनी मिळून एकत्र काम केलं तर महाराष्ट्र शेतीमध्ये अग्रेसर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
धुळे इथं पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थिती पीएम धनधान्य कृषी योजनेला प्रारंभ झाला.