प्रधानमंत्री दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी जॉर्डनला रवाना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जॉर्डन, इथीओपिया आणि ओमान या ३ देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. सर्वप्रथम ते जॉर्डनला भेट देतील. या भेटीत ओमानचे राजे अब्दुल्ला द्वितीय इब्न अल हुसेन आणि प्रधानमंत्री  जफर हुसेन यांच्याशी परस्परसंबंधाबाबत चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी रवाना होताना  सांगितलं. याशिवाय ते जॉर्डनमधल्या भारतीय समुदायाचीही  भेट घेणार आहेत. प्रधानमंत्री उद्या इथीओपियाची राजधानी आदीस अबाबा कडे रवाना होतील. प्रधानमंत्री मोदी इथीओपियाच्या प्रधानमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करतील, तसंच तिथल्या संसदेच्या सभागृहांना सयुंक्तरीत्या संबोधित करतील आणि भारतीय समुदायाशी संवाद साधतील. 

 

दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात येत्या बुधवारी मोदी ओमानची राजधानी मस्कतला जातील. भारत आणि ओमान यांच्यातल्या परस्पर संबंधांना ७० वर्ष पूर्ण होत असतानाची प्रधानमंत्र्यांची ही भेट  विशेष ठरणार आहे. प्रधानमंत्री या भेटीत मस्कतच्या सुलतानांची भेट घेऊन भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत.