April 29, 2025 9:41 AM

printer

 पहलगाम हल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांची चर्चा

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल नवी दिल्ली इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पुढील कारवाईविषयी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. तत्पूर्वी सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी संरक्षण मंत्र्यांना महत्वपूर्ण निर्णयांची माहिती दिल्यानंतर ही बैठक ठरवण्यात आली होती.  

 

दरम्यान प्रधानमंत्री आज नवी दिल्ली इथं होणाऱ्या युग्म या संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत. संस्कृतीमधील संगम म्हणजे युग्म आणि ही अशा प्रकारची पहिलेच धोरणात्मक संमेलन आहे ज्यामध्ये सरकार,शैक्षणिक संस्था,उद्योग आणि नवोन्मेषकांच्या नेत्यांना सहभागी होता येतं.

 

वाधवानी फाउंडेशन आणि सरकारी संस्थांच्या संयुक्त गुंतवणुकीसह एकंदर 1 हजार 400 कोटी रुपयांच्या सहयोगी प्रकल्पातून  चालणाऱ्या देशाच्या नवोन्मेष प्रवासात हे संमेलन योगदान देईल. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.