प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण देशासह राज्यभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम होतील; त्याचबरोबर ‘विकसित भारत संवाद’ ही ऑनलाइन व्याख्यानमालाही होणार आहे. तसंच रक्तदान शिबिरं, स्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी शिबिरं, आरोग्यविषयक कार्यशाळा, पथनाट्य असे कार्यक्रमही होणार आहेत.
युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीनं, स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दिल्लीतील त्यागराज मैदानावर 15 प्रमुख योजनांचा शुभारंभ करणार आहेत. उत्तर प्रदेश सरकार सेवा पर्वा निमित्त 15 लाख वृक्ष लागवड, स्वच्छता पंधरवडा यासारखे कार्यक्रम राबवणार आहे.