डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्री आज करणार बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ

प्रधानमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आज बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत, बिहारमधील भाजपाच्या बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. मेरा बूथ सबसे मजबूत मोहिमेअंतर्गत प्रधानमंत्री मोदी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने काल 71 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

 

एनडीएचा आणखी एक मित्रपक्ष असलेल्या हिंदुस्तानी अवाम मोर्चा सेक्युलर या पक्षानेही 6 उमेदवारांची यादी जाहीर केली. दुसरीकडे, विरोधी पक्ष असलेल्या सीपीआय एम एल लिबरेशनने विधानसभा निवडणुकीसाठी 18 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान, महाआघाडीच्या घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत बैठकांचं सत्र सुरू आहे, आज हे जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.