प्रधानमंत्री येत्या शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं राष्ट्रीय स्टार्टअप दिवस २०२६ निमित्त देशवासियांना संबोधित करणार आहेत. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे (डीपीआयआयटी) सचिव अमरदीपसिंग भाटिया यांनी आज वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. देशात स्टार्टअप सुरु होऊन दहा वर्ष झाली आहेत, त्यामुळे स्टार्टअपशी संबंधित प्रत्येकासाठी हा खूप महत्वाचा दिवस आहे, असं ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात देशातील तीन हजारांहून अधिक स्टार्टअप्स या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.