प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. गांधीवादी विचारसरणीचे विनोबा भावे यांनी आपलं संपूर्ण जीवन उपेक्षितांच्या कल्याणासाठी समर्पित केलं, अशा शब्दात प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाज माध्यमावर त्यांना अभिवादन केलं आहे.
स्वामी विवेकानंद यांनी १८९३ मध्ये शिकागो इथल्या जागतिक धर्मपरिषदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या १३२व्या वर्धापन दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांनी या दिवसाचं स्मरण केलं आहे. वैश्विक बंधुत्वाला साद घालणारा स्वामीजींच्या भाषणाचा तो प्रसंग अतिशय ऐतिहासिक होता, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.