तरुणांना भारतीय परंपरांशी जोडण्यात महान जैन ऋषींचे मोलाचं योगदान आहे, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं आचार्य विद्यानंद जी महाराजांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर व्यक्त केलं. या प्रसंगी त्यांनी जैन मुनींच्या हस्त लिखीतांचं डीजीटायजेशन करण्याबद्दल माहिती दिली.
वेळी प्रधानमंत्र्यांनी आचार्याजींना आदरांजली अर्पण करण्यासाठी प्रत्येक भारतीय भारतीयांनी अवलंब करावा, अशा 9 संकल्पांविषयी आपलं मत व्यक्त केलं. यात ते म्हणाले की, प्रत्येक भारतीयांनी पाणी वाचवण्यासाठी कटीबद्ध असायला हवं. प्रत्येकानं आपल्या आईच्या प्रेमाखातर एक झाड तरी लावावं हीच खरं वसुंधरेच्या संरक्षणासाठी आपलं योगदान असेल. वोकल फॉर लोकलची कास धरत स्वदेशी उत्पादनांनाच प्राधान्य द्यायला हवं. नैसर्गिक शेती, सुदृढ जीवनशैली, नियमित योग, व्यायाम. जेवणात श्री अन्नाला प्राधान्य, गरिबांना मदत हीच आचार्यांना खरी आदरांजली असेल, असही प्रधानमंत्री म्हणाले. वेळी विशेष स्मारक नाणं आणि टपाल तिकिटाचंही प्रकाशन करण्यात आले. यावेळी विशेष मनोरंजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.