विकसित भारतासाठी भविष्यातील कृषी प्रणाली तयार करण्याकरिता एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांचं नरेंद्र मोदी यांनी काल कोईमतूर इथं केलं. दक्षिण भारत नैसर्गिक कृषी शिखर परिषदेचं उद्घाटन करताना पंतप्रधान बोलत होते. प्रधानमंत्री शेतकऱ्यांना एका हंगामात एक एकर भूभागावर सेंद्रिय शेती करण्याचं आणि त्याचे अद्भुत परिणाम पाहण्याचं आवाहन केलं.
शेतीचं आधुनिकीकरण करण्यासाठी सरकार सकारात्मक पावलं उचलत आहे, किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दहा लाख कोटी रुपयांची मदत सरकारने दिल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या अकरा वर्षात देशातल्या कृषी क्षेत्रात परिवर्तन झालं असून भारत नैसर्गिक शेतीसाठी जागतिक केंद्र बनत आहे, असंही प्रधानमंत्री म्हणाले. यावेळी किसान सन्मान योजनेचा 21 वा हप्ता प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
देशभरातल्या नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली. महाराष्ट्रातल्या 90 हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान निधीच्या 21 व्या हप्त्याचे एक हजार 808 कोटी 25 लाख रुपये जमा झाले आहेत.