सध्या विविध क्षेत्रातील जागतिक अस्थिरतेच्या आणि आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारत विकसित देश होण्याच्या आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहे, अस प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केल. नवी दिल्लीत काल आयोजित 6 व्या रामनाथ गोयंका व्याख्यानात ते बोलत होते.यावेळी प्रधानमंत्र्यांनी विविध विषयांचा आपल्या भाषणात विस्तृत आढावा घेतला प्रधानमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की भारत आज जगात केवळ सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून पुढे येत नसून विकसंच नवीन मॉडेल म्हणून ही आदर्श ठरत आहे.
2022 साली युरोपात आलेल जागतिक उत्पादन पुरवठा साखळी संकट आणि ऊर्जा संकट असो अथवा 2023 मध्ये पश्चिम आशियातील आर्थिक स्थिति प्रतिकूल झाली असताना ही भारताचा आर्थिक विकासाचा दर मजबूत राहिला आणि सध्या ही तो 7 टक्क्यांच्या आसपास आहे अस ही मोदी यांनी सांगितल. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल ऐतिहासिक असून 1951 नंतर बिहार मध्ये सर्वात जास्त मतदान झाल असल्याच सांगून मोदी म्हणाले की यावेळी मतदानंत पुरुषांपेक्षा महिलंच मतदान 9 टक्क्यांनी जास्त होत आणि हे यशस्वी लोकशाहीच द्योतक आहे.