प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे या महिन्याच्या 17 तारखेपासून देशभरात सेवा पंधरवडा आयोजित करण्यात येणार आहे. काल नवी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी ही माहिती दिली. हा सेवा पंधरवडा महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीपर्यंत, दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. या काळात देशभर विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पुण्यातही या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 16 सप्टेंबर रोजी पुण्यात, आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा ड्रोन शोसह दिव्यांग सहाय्यता शिबीर आणि संगीत रजनीचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
माननीय मोदीजींचं हे पंच्याहत्तरावं जन्मवर्ष आहे त्याबद्दल या शहरातील पंच्याहत्तर हजार विद्यार्थ्यांकडून आम्ही त्यांना शुभेच्छापत्र लिहून घेऊन ते पाठवण्याची व्यवस्था करणार आहे. विद्यार्थ्यांनाही आपल्या देशातील प्रधानमंत्र्यांना एका पोस्ट कार्डवरतीचे शुभेच्छा संदेश देण्याची या निमित्तानं संधी उपलब्ध होणार आहे आणि याच्यासोबत एक महत्त्वाचा खूप चांगला कार्यक्रम ज्याचं एक आकर्षण खूप मोठं राहील माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखालील अकरा वर्षाच्या कामाची एक रूपरेषा असेल आणि विकसित भारताचा संकल्प म्हणून याच्यावरती आधारित एक चाळीस मिनिटांचा ड्रोन लाईट शो सप महाविद्यालयाच्या मैदानावरती आपण आयोजित करतोय मला असं वाटतं की किंबहुना महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असा ड्रोन लाईट शो होतोय.