प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते नंद्याल जिल्ह्यातल्या श्रीशैलम इथल्या श्री भ्रमरम्बा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानम इथं पूजा करतील.
ते श्रीशैलममधील श्री शिवाजी स्फूर्ती केंद्रालाही भेट देणार आहेत. तसंच प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कुर्नूलमध्ये सुमारे 13 हजार 430 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात येणार आहे. या दौऱ्यात एका जाहीर सभेला देखील प्रधानमंत्री संबोधित करणार आहेत.