अमेरीकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्त्वाखाली गाझा पट्टीत शांतता प्रस्थापित होण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे.
ओलिस ठेवलेल्यांची सुटका होण्याचे संकेत म्हणजे सध्याच्या मानवतावादी आणि मुत्सद्देगिरीच्या प्रयत्नांचे फलित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारत कायमस्वरूपी आणि न्यायपूर्ण शांततेच्या दिशेनं केलेल्या सर्व प्रयत्नांना नेहमीच पाठिंबा देत राहिल, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.