डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 15, 2025 1:40 PM | narendr modi

printer

तिन्ही सेनादलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संयुक्त परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता इथं तीन दिवसीय संयुक्त कमांडर्स परिषदेचं उद्घाटन केलं. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. या परिषदेत सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, तसंच लष्कर, हवाई दल आणि नौदल प्रमुख देखील सहभागी झाले.

 

यावेळी लष्करी तसंच राजकीय धोरणांवर चर्चा होणार असून ‘सुधारणांचं वर्षः भविष्यासाठी परिवर्तन’ अशी या परिषदेची संकल्पना आहे. सशस्त्र दलांमध्ये सुधारणा, आधुनिकीकरण आणि सुसज्जता हे याचं उद्दिष्ट आहे. 

 

तत्पूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं काल रात्री कोलकाता इथं आगमन झालं. आज सकाळी साडे नऊ वाजता ते विजय दुर्ग या परिषदेच्या ठिकाणी पोहोचले. दुपारी ते बिहारला रवाना होतील.  पूर्णिया जिल्ह्यात ते ३६ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचा प्रारंभ करतील.