मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ. नवीनचंद्र रामगुलाम आणि त्यांच्या पत्नी वीणा रामगुलाम यांचं आज आठ दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी मुंबईत आगमन झालं. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं. रामगुलाम यांनी यापूर्वी मे २०१४ मध्ये भारताला भेट दिली होती.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाला ते पाहुणे म्हणून उपस्थित होते. या दौऱ्यात, ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील. दोन्ही देशातील धोरणात्मक सहकार्य आणखी मजबूत करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशीही ते चर्चा करतील. डॉ. रामगुलाम नवी दिल्ली बरोबरच वाराणसी, अयोध्या आणि तिरुपतीलाही भेट देणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.