प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं भाजपा खासदारांच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या सांगता समारंभाला संबोधित करणार आहेत. उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेचं मूलभूत प्रशिक्षण खासदारांना देण्यासाठी कालपासून ही कार्यशाळा घेण्यात आली.
प्रधानमंत्री सर्व प्रशिक्षण सत्रांमध्ये उपस्थित होते, अशी माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. संयुक्त लोकशाही आघाडीतल्या इतर पक्षांचे खासदारही आज कार्यशाळेत सहभागी होतील. वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी सुधारणांवरचा ठराव या कार्यशाळेत सादर केला आणि भाजपा संसदीय सदस्यांनी त्याला एकमतानं मंजुरी दिली.