प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी जपानला रवाना होणार आहे. १५ व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत. जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांच्यासोबतची ही त्यांची शिखर परिषद आहे. संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार, तंत्रज्ञान, आणि नवोन्मेष यावर या बैठकीत चर्चा होईल, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात, प्रधानमंत्री मोदी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आमंत्रणावरून ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान तियानजिन इथं होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला जातील. शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या अनेक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेण्याची अपेक्षा आहे.