सामर्थ्य आणि लवचिक धोरणांच्या बळावर भारत जगासाठी आशास्थान बनल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल एका माध्यमसंस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. देशात महागाई नियंत्रणात आहे, व्याजदर कमी आहेत तसंच परकीय चलनसाठ्याची स्थिती मजबूत आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले.
जगाच्या आर्थिक विकासात भारताचं योगदान वीस टक्क्याच्या आसपास आहे, जगाला आर्थिक मंदीतून बाहेर काढण्याचं काम भारत करत असून दरमहा लाखो गुंतवणूकदार हजारो कोटींची गुंतवणूक करत असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. सेमिकंटक्टर क्षेत्र, अवकाश संशोधन क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.