सेमीकंडक्टर क्षेत्रात देश वेगाने प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशाच्या डिजिटल भविष्याला बळ देण्यासाठी याद्वारे एक गतीमान परिसंस्था उभारली जात असून जागतिक नवोन्मेषालाही चालना मिळत आहे असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं. काल केंद्रिय मंत्रीमंडळानं ओडिशा, पंजाब आणि आंध्र प्रदेशातल्या चार नव्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पांना मंजूरी दिली.
या निर्णयामुळे उत्पादन क्षमता वाढेल, उच्च कौशल्याची आवश्यकता असलेले रोजगार निर्माण होतील शिवाय जागतिक पुरवठा साखळीत भारताला प्रमुख स्थान मिळेल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशातल्या लखनऊ इथला मेट्रो रेल्वे प्रकल्प, अरुणाचल प्रदेशातला जलविद्युत प्रकल्प यांनाही मंत्रीमंडळानं मंजूरी दिल्याचीहिती, केंद्रिय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.