नरेंद्र मोदी हे सलग सर्वाधिक काळासाठी प्रधानमंत्रीपदी राहिलेले दुसरे प्रधानमंत्री ठरले आहेत. त्यांनी प्रधानमंत्रीपदाचे 4 हजार 78 दिवस काल पूर्ण केले. माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचा या संदर्भातला विक्रम त्यांनी मोडला आहे.
भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी काल माध्यमांना ही माहिती दिली. प्रधानमंत्री मोदी यांचा कार्यकाळ विकासाचे सुवर्णयुग ठरला, असं मत त्यांनी नोंदवलं. माजी प्रधानमंत्री पंडीत नेहरु यांनी सर्वाधिक म्हणजे सलग 17 वर्ष प्रधानमंत्री म्हणून काम केलं आहे.