भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल एक उच्चस्तरीय बैठक झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, सरसेनाध्यक्ष आणि तीनही सशस्त्र दलांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. त्याचबरोबर पंतप्रधानांनी काल माजी लष्करप्रमुख, माजी हवाईदल आणि नौदल प्रमुख तसंच सैन्य दलातील माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी सध्याच्या परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा केली.
Site Admin | May 10, 2025 9:34 AM | PM Narendra Modi
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक