डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 22, 2025 7:40 PM | PLI Scheme Drives

printer

१४ प्रमुख क्षेत्रांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७६४ अर्जांना मंजुरी

१४ प्रमुख क्षेत्रांसाठी पी एल आय अर्थात उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७६४ अर्जांना मंजुरी मिळाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. घाऊक औषधं, वैद्यकीय उपकरणं, औषधनिर्मिती, दूरसंचार, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रिकल उपकरणं, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग आणि ड्रोन या क्षेत्रातल्या १७६ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांशी संबंधित अर्जांना पी एल आय योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली आहे. या क्षेत्रात गेल्या नोव्हेंबरपर्यंत १ लाख ६१ हजार कोटी रुपयांची प्रत्यक्ष गुंतवणूक आढळून आली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा