September 10, 2024 3:04 PM

printer

राष्ट्रीय महामार्गांवर उपग्रह संदेश प्रणालीमार्फत टोल भरण्यासाठी एक मार्गिका राखीव

राष्ट्रीय महामार्गांवर उपग्रह संदेश प्रणालीमार्फत टोल भरण्यासाठी एक मार्गिका राखीव ठेवण्यात येणार आहे. या मार्गिकेतून जाणाऱ्या वाहनांमधे ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट यंत्रणा बसवलेली असली पाहिजे, अन्यथा या वाहनांकडून दुप्पट टोल वसूल केला जाईल असं रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. वाहतुकीचा राष्ट्रीय परवाना नसलेल्या मात्र जीएनएसएस लावलेल्या वाहनांना राष्ट्रीय महामार्गाचा वापर २० किलोमीटर अंतरापर्यंत विनाशुल्क करता येणार आहे.  

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.