राज्यातील 16 कृषी उत्पन्न बाजार समित्या ई- नामशी जोडून आधुनिक तंत्रज्ञानानं त्या अद्ययावत ठेवल्या जाणार असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी काल पुण्यात सांगितलं. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या संचालक मंडळाची बैठक रावल यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. कृषी पणन मंडळाची कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडील थकीत कर्जवसुलीबाबत कार्यवाही करावी, कृषी पणन मंडळाच्या ताब्यातील जागेचा पुरेपूर उपयोग करावा, कृषी पणन मंडळात प्रकल्प सल्लागाराची नेमणूक करावी, याकरता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबतच तज्ज्ञ सल्लागाराची मदत घ्यावी, अशा सूचनाही रावल यांनी यावेळी दिल्या.
Site Admin | February 6, 2025 10:50 AM | ई-नाम | कृषी उत्पन्न बाजार समित्या | पणन मंत्री जयकुमार रावल
राज्यातील 16 कृषी उत्पन्न बाजार समित्या ई-नामसोबत जोडण्याचं नियोजन
