२०२६पर्यंत एकाच वेळी अवकाशात गगनयान आणि समुद्रात समुद्रयान सोडण्याच्या दृष्टीने नियोजन – भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन

२०२६पर्यंत एकाच वेळी अवकाशात गगनयान आणि समुद्रात समुद्रयान सोडण्याच्या दृष्टीने नियोजन आहे, अशी माहिती भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी काल पुण्यात दिली. भारतीय समशीतोष्ण हवामान संस्थेत आयोजित एका प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. हवामानाचा आणखी अचूक अंदाज वर्तवता येण्याच्या दृष्टीनं डिजिटल सॉफ्टवेअर प्रणाली विकसित करण्याकडे लक्ष्य केंद्रित केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय महापात्र यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.