आधुनिक भारतीय जाहिरात क्षेत्राचे शिल्पकार पियुष पांडे यांचं मुंबईत आज सकाळी निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. गेले काही दिवस ते विषाणू संसर्गाने आजारी होते.
ऑगिल्व्ही या जाहिरात कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष असलेले पांडे यांना २०१६ साली पद्मश्री ने सन्मानित करण्यात आलं होत.
भारतीय जनता पक्षाच्या ‘अबकी बार मोदी सरकार’ या जाहिरातीचे, तसंच पोलिओ लस अभियानाच्या ‘दो बूंद जिंदगी के’ या जाहिरातींचे ते जनक होते. कॅडबरी डेरी मिल्क, एशियन पेंट्स, वोडाफोन इत्यादी अनेक सुप्रसिद्ध कंपन्यांच्या जाहिरातींच्या कल्पना त्यांनीच यशस्वी केल्या होत्या.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे.