फिनटेक क्षेत्राने नैतिकता वापरुन पैशांचा गैरव्यवहार आणि आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी कृत्रिम बुध्दीमत्तेचा कसा उपयोग करता येईल याकरिता प्रयत्न करावेत – मंत्री पियुष गोयल

फिनटेक क्षेत्राने नैतिकता वापरुन पैशांचा गैरव्यवहार आणि आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी कृत्रिम बुध्दीमत्तेचा कसा उपयोग करता येईल याकरिता प्रयत्न करावेत असं आवाहन केंद्रिय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी फिनटेक क्षेत्राला केलं आहे.मुंबईत आयोजित फिनटेक महोत्सव 2024 ला संबोधित करताना ते बोलत होते. देशातील फिनटेक क्षेत्राने भारताला गौरव मिळवून दिला आहे असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी बोलताना काढले.