भारत – अमेरिका व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्याला येत्या नोव्हेंबरपर्यंत अंतिम स्वरुप येईल असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज पाटणा इथं बातमीदारांशी बोलत होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी गेल्या फेब्रुवारीत तशा सूचना दिल्या आहेत असं ते म्हणाले. या संदर्भात प्रधानमंत्र्यांचा ट्रंप यांच्याशी समाजमाध्यमावर मैत्रीपूर्ण संवाद झाल्याच्या पार्श्वभूमीवर गोयल यांनी ही माहिती दिली.