कोणत्याही देशाबरोबर मुक्त व्यापार कराराबाबतच्या वाटाघाटी करताना, राष्ट्रीय हित आणि भारतीय उद्योगांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल मुंबईत एका खासगी कार्यक्रमात बोलत होते.
भारत युरोपीय संघाच्या नियमितपणे संपर्कात असून, आणखी तीन ते चार व्यापार करारांवर चर्चा सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. जागतिक परिस्थितीकडे भारताचं बारकाईनं लक्ष असून, पारदर्शक संबंध ठेवता येतील, अशा भागीदारांबरोबर सक्रीय पद्धतीनं काम करत असल्याचंही गोयल यांनी सांगितलं.