डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

March 18, 2025 8:45 PM

printer

भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करारामुळे देशांमधले संबंध दृढ होतील- पीयूष गोयल

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराबाबतच्या चर्चेमुळे उभय देशांमधले संबंध दृढ होतील, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी आज व्यक्त केला.

 

ते नवी दिल्लीत भारत- न्यूझीलंड आर्थिक मंचाला संबोधित करत होते. येत्या दहा वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील व्यापार दहा पट वाढण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली. दोन्ही देश तरुणाईला आपल्या सामर्थ्याचा वापर करण्याची संधी उपलब्ध करून देत असल्याचं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.