डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पीएम गतीशक्तीने सकारात्मक बदल घडवून आणला – केंद्रीय मंत्री पियूष गोयल

पायाभूत सुविधा प्रकल्प राबवण्यात पीएम गतीशक्ती ने सकारात्मक बदल घडवून आणला आहे,असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं. वेगवेगळी मंत्रालयं आणि राज्यांकडून डेटा गोळा करून सरकारने पारदर्शक आणि कार्यक्षम यंत्रणा तयार केली आहे, पीएम गती शक्तीमुळे प्रकल्प वेगात पूर्ण होत आहेत, खर्च कमी येत आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यात चांगल्या सेवा पुरवल्या जात आहेत, असं  गोयल म्हणाले.  

पीएम गती शक्ती नॅशनल मास्टर प्लॅनला उद्या तीन वर्षे पूर्ण होत आहेत. १३ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याला सुरुवात केली होती.