डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 22, 2024 7:11 PM | Piyush Goyal

printer

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केली उत्तर मुंबईतल्या प्रकल्पांची पाहणी

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज उत्तर मुंबईतल्या प्रकल्पांची पाहणी केली. त्यांनी उत्तर मुंबईतल्या दौराची सुरुवात चिंचोली इथल्या शताब्दी महानगरपालिका शाळेला भेट देऊन तिथल्या सुविधांचा आढावा घेतला. यावेळी शाळेतल्या विद्यार्थी आणि शिक्षकांशी त्यांनी संवाद साधला.  त्यानंतर गोयल  यांनी मालाड इथल्या काम सुरु असलेल्या मीठ चोकी उड्डाणपूलाची पाहणी केली. या पुलाचं काम सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्याबाबत आवश्यक सूचना देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. मालाड इथं निर्माण होत असलेल्या ६०० एकरच्या वेदिक पार्कची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर अथर्व महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. ‘उत्तर मुंबई ही उत्तम मुंबईत परिवर्तित होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिली. गोयल यांनी उत्तर मुंबईच्या विविध समस्यांबाबत मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, वाहतूक प्रशासन आदींसह सर्व प्राधिकरणांची बैठक घेतली.