November 18, 2025 3:58 PM

printer

तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात भारत जगाचं नेतृत्व करेल

तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात भारत जगाचं नेतृत्व करेल, असा विश्वास वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी आज व्यक्त केला. नवी दिल्ली इथं फिक्कीच्या ९८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

 

२०४७ पर्यंत विकसित भारताचं ध्येय पूर्ण करण्यासाठी सरकार नवोन्मेष क्षेत्राला चालना देत असल्याचं गोयल यांनी सांगितलं. त्यासाठी नागरिकांमध्ये योग्य कौशल्यं विकसित करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.