भारत आणि आफ्रिकेच्या इच्छा आणि आकांशा यात खूप साम्य – मंत्री पीयूष गोयल

भारत आणि आफ्रिकेच्या इच्छा आणि आकांशा यात खूप साम्य असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत सुरू असलेल्या CII भारत आफ्रिका व्यापारी परिषदेत ते बोलत होते. भारत आणि आफ्रिका हे दोन्ही देश त्यांच्या नागरिकांना चांगले जीवमान देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी अधिक गुंतवणूक व्हावी आणि आर्थिक  परिस्थिती मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांत अधिकाधिक गुंतवणूक होण्याची गरज असल्याचं पियुष गोयल यांनी सांगितलं.