ओएनडीसी अर्थात ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स या उपक्रमाने देशातल्या डिजिटल व्यापाराचं सार्वत्रिकीकरण करून देशाच्या ई-कॉमर्स क्षेत्रात बदल घडवून आणत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. गेल्या चार वर्षात ओएनडीसीने मुक्त सहभाग आणि नावीन्यपूर्ण संकल्पना तसंच सहकार्याला चालना दिली आहे. या उपक्रमामुळे लहान दुकानदारांना डिजिटल बाजारपेठेत आणून डिजिटल परिसंस्थेवरचा विश्वास मजबूत केला, असं गोयल म्हणाले.
Site Admin | December 31, 2025 2:45 PM | ONDC | Piyush Goel
ओएनडीसी उपक्रमामुळे देशाच्या ई-कॉमर्स क्षेत्रात बदल – मंत्री पियूष गोयल