उद्योग मंत्री पियुष गोयल अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार

अमेरिका – भारत व्यापार करारावरील चर्चेला गती देण्यासाठी भारताचं शिष्टमंडळ घेऊन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उद्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उभय देशातील परस्पर फायदेशीर व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या उद्देशानं चर्चा पुढे नेण्याची या शिष्टमंडळाची योजना असल्याचं मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. याआधी १६सप्टेंबरला भारतात आलेल्या अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं या व्यापार कराराच्या विविध पैलूंवर सकारात्मक चर्चा केली असून या संदर्भात प्रयत्न अधिक गतिमान करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचंही मंत्रालयानं सांगितलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.