राज्यस्तरीय युवा महोत्सव पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू झाला आहे. राज्याच्या क्रीडा आणि युवक कल्याण विभागाच्या आयुक्त शितल तेली उगले यांच्या हस्ते काल या महोत्सवाचं उद्घाटन झालं. युवा महोत्सवाच्या माध्यमातून युवक-युवतींना विविध क्षेत्रांत आपले नेतृत्वगुण सिद्ध करण्याचं सशक्त व्यासपीठ मिळतं. युवकांचा सर्वांगिण विकास, भारतीय संस्कृती-परंपरांचं जतन आणि राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचं आयोजन केलं जातं असं त्या म्हणाल्या. उद्यापर्यंत चालणाऱ्या या युवा महोत्सवात राज्यातील ३१२ युवक-युवती सहभागी झाले आहेत. या महोत्सवात होणाऱ्या विविध स्पर्धांतील विजेते संघ येत्या १० ते १२ जानेवारी दरम्यान दिल्लीमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करणार आहेत.
Site Admin | December 31, 2025 9:05 AM | YUVA MOHOTSAV
राज्यस्तरीय युवा महोत्सव पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू