समावेशक विकासाची ११ वर्षं या संकल्पनेवर आधारित ‘वार्ता’ या माध्यम कार्यशाळेचं आयोजन पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयानं आज केलं आहे. नवी मुंबई परिसरात काम करणारे माध्यम प्रतिनिधी यात सहभागी झाले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स-शर्मा यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी यात माध्यम प्रतिनिधींना मार्गदर्शन करणार आहेत.