डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

December 10, 2024 7:04 PM | Philippines

printer

फिलीपिन्समधे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे सुमारे ८७ हजार लोकांचं स्थलांतर

फिलीपिन्समधल्या  नेग्रोस बेटावरच्या  माउंट कानलाओन या ज्वालामुखीचा  उद्रेक झाल्या असून या भागातून  सुमारे ८७ हजार  लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.  या उद्रेकात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, संभाव्य उद्रेकांचा  धोका असल्यानं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ज्वालामुखीची राख विस्तृत क्षेत्रावर पडल्यानं तिथली  दृश्यमानता कमी झाली असून  आरोग्याला  धोका निर्माण झाला आहे. देशांतर्गत आणि देशाबाहेरील  उड्डाणं रद्द  करण्यात आली आहेत किंवा मार्ग बदलण्यात आले आहेत, अशी माहिती फिलिपिन्सच्या  नागरी संरक्षण कार्यालयानं दिली आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.