युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) कार्यान्वित करण्यासाठी अधिसूचना जारी

निवृत्ती वेतन नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए)ने एकीकृत निवृत्तीवेतन योजना, म्हणजेच यूपीएस कार्यान्वित करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने या वर्षी जानेवारीमध्ये यूपीएस ही योजना आणली आहे. याचे नियम पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून लागू होतील. एनपीएस अंतर्गत येणारे आणि 1 एप्रिल 2025 पर्यंत केंद्र सरकारी सेवेत असलेले कर्मचारी, 1 एप्रिल 2025 रोजी किंवा त्यानंतर केंद्र सरकारच्या सेवेत भरती झालेले कर्मचारी आणि 31 मार्च 2025 रोजी किंवा त्यापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.