कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांना आता त्यांच्या पीएफ खात्यातली रक्कम लग्न, घर खरेदी यासारख्या कारणासाठी अवघ्या एक वर्षात काढता येणार आहे. यापूर्वी यासाठी ५-७ वर्ष थांबावं लागत होतं. शिक्षण आणि आजारपणासाठी पीएफमधली रक्कम काढणंही आता सोपं झालंय. तसंच विशेष संकटाच्या परिस्थिती पीएफमधली शिल्लक रक्कम वर्षातून २ वेळा काढता येईल अशी माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगारमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे. नोकरी सुटल्यावर कर्मचाऱ्यांना लगेच ७५ टक्के रक्कम काढता येईल, उर्वरित रक्कम एक वर्ष झाल्यावर काढता येईल. यापूर्वी पीएफमधून वारंवार पैसे काढून घेणाऱ्यांना निवृत्तीवेतनासाठीची १० वर्षांची अट पूर्ण करता येत नव्हती. आता यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
Site Admin | October 15, 2025 7:54 PM | PF Account
पीएफ खात्यातली रक्कम एका वर्षात काढता येणार