पेट्रोलियम वितरण कंपन्या बोगस ग्राहक हुडकून काढण्यासाठी ई – के वाय सी मोहीम राबवत आहेत – मंत्री हरदीप सिंह पुरी

पेट्रोलियम वितरण कंपन्या बोगस ग्राहक हुडकून काढण्यासाठी ई – के वाय सी मोहीम गेल्या आठ महिन्यांपासून राबवत आहेत , असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं. एल पी जी गॅस सिलिंडरचं वितरण करतेवेळी मोबाईल अँपचा वापर करून आधार क्रमांकासह ग्राहकांचे इतर तपशील तपासले जातात, यावेळी ग्राहकांना ओ टी पी देखील पाठवला जातो, असं त्यांनी स्पष्ट केलं. या पडताळणी प्रक्रियेचा सामान्य ग्राहकांना त्रास होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ते बोलत होते. ग्राहकांना कोणताही त्रास होऊ नये यादृष्टीनं तेल वितरण कंपन्यांनी या संदर्भात एक स्पष्टीकरणही प्रसारित केलं असल्याचं त्यांनी सांगितलं .