योग्य जागा दिल्या नाहीत तर ३० जागांवर निवडणूक लढणार – पीपल्स रिपब्लिकन पक्ष

विधानसभा निवडणुकीत महायुतीनं योग्य जागा दिल्या नाहीत तर आपण राज्यात ३० जागांवर निवडणूक लढणार असल्याचं पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी स्पष्ट केलं आहे. ते ठाण्यात बातमीदाराशी बोलत होते. राज्य मंत्रिमंडळात एक कॅबिनेट, एक राज्यमंत्री आणि एका महामंडळात पक्षाला प्रतिनिधित्व द्यावं, अशी मागणीही कवाडे यांनी केली आहे. केंद्रातल्या रालोआ सरकारनं कष्टकरी, शेतकऱ्यांसाठी काम करावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.