निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभाग येत्या १ ते ३० नोव्हेंबर दरम्यान देशभरात चौथी डीएलसी, अर्थात संगणकीकृत हयातीच्या दाखल्यांची मोहीम राबवणार आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी मोहीम असून, देशातले एकूण २ हजार जिल्हे आणि उप-विभागीय मुख्यालयांमध्ये ती राबवली जाईल.
या टप्प्यात देशभरात २ कोटीपेक्षा जास्त निवृत्ती वेतन धारकांना डिजिटल हयातीचे दाखले वितरित करण्याचं उद्दिष्ट असून, निवृत्ती वेतनधारकांच्या सोयीसाठी फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानावर विशेष भर दिला जाईल.