प्रसारभारतीच्या पीबी शब्द या व्यासपीठावर नोंदणी करण्याचं आवाहन देशातली सर्व वर्तमानपत्रं, नियतकालिकं आणि दूरचित्र वाहिन्यांना करण्यात आलं आहे. या वृत्तसेवेत प्रसार भारतीच्या छापील बातम्या आणि द्कश्राव्य साहित्य विनामूल्य घेऊन वापरता येतील. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी प्रसारभारतीच्या विश्वासार्ह बातम्या आणि माहिती विविध नियतकालिकांमधून प्रसारित करण्यावर भर दिला आहे. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात सुरु झालेल्या पीबी शब्द या व्यासपीठाद्वारे दररोज ४० हून अधिक विविध क्षेत्रातल्या ८०० हून अधिक बातम्या विविध भाषांमध्ये प्रसारित होत असतात. या व्यासपीठावरुन अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे थेट प्रसारणही उपलब्ध असतं. या बरोबरच प्रसारभारतीकडे विविध घटनांचा समृद्ध ठेवा असून त्याचाही वापर नियतकालिकांना आणि वाहिन्यांना करता येणार आहे.
Site Admin | July 24, 2025 2:29 PM | PB-SHABD
प्रसारभारतीच्या पीबी शब्द या व्यासपीठावर नोंदणी करण्याचं आवाहन