इंग्लंडमध्ये लिव्हरपूल इथं जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवशी भारताच्या पवन बर्तवाल या खेळाडूनं ५५ किलो वजनी गटात ब्राझीलच्या मायकल डग्लस दा सिल्वा त्रिनदेद या खेळाडूचा ३-२ असा पराभव केला. या स्पर्धेत भारताकडून २० खेळाडूंचा संघ सहभागी होत आहे. यात पुरुष संघात सुमित कुंडू, सचिन सिवाच, हर्ष चौधरी, जादूमणी सिंग मंडेन्गबम, हितेश गुलिया आणि अविनाश जामवाल असे खेळाडू आहेत. तर महिला संघात निखत जरीन, लवलिना बोरगोहेन, पूजा राणी या अनुभवी खेळाडू आहेत.
Site Admin | September 4, 2025 8:20 PM
इंग्लंडमध्ये आज सुरु झालेल्या जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या पवन बर्तवालची विजयी सलामी
