एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना उद्यापासून तिकीट दरात १५ टक्के सवलत मिळणार आहे. प्रवाशांना प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर, एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर, तसंच ॲपवर आगाऊ आरक्षण करता येईल.
दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांचा गर्दीचा काळ सोडता वर्षभर ही योजना सुरू राहील. मात्र, फक्त पूर्ण तिकीट काढणाऱ्या, कोणत्याही सवलतीचा लाभ न घेणाऱ्या प्रवाशांनाच या योजनेचा फायदा घेता येईल. तसंच जादा बसेससाठी ही सवलत लागू नसेल.